"Healthcare with Humane touch"

Ashtvinayak Helpline

जाणून घ्या “गायनॅकॉलॉजी म्हणजे काय”. स्त्रीरोग तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि स्त्री आरोग्याची महत्त्वाची माहिती

जाणून घ्या “गायनॅकॉलॉजी म्हणजे काय”. स्त्रीरोग तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि स्त्री आरोग्याची महत्त्वाची माहिती प्रस्तावना स्त्री च्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई होणे. ज्यावेळी एखादी स्त्री ही आई होते तेंव्हा ती परिपूर्ण होते असे मानले जाते.  पण आई होणे हे आजच्या धकधकीच्या आयुष्यात खूप कष्टप्राय झालेले दिसून येतेय. दिवसेंदिवस बदलणारी जीवनशैली, आहारपद्धती आणि वेगवान आयुष्य यामुळे स्त्रीचे आरोग्य हे दिवसेंदिवस खालावत जात असलेले दिसून येत आहे. आई होण्याची प्रक्रिया हि मुलगी वयात आल्यानंतर तिच्या मासिक धर्माची सुरुवात झाली की सुरु होते असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. पण बदलणाऱ्या जीवनशैली मुले मासिक धर्म सुरु होण्याचा वयोगट हा दिवसेंदिवस खाली येताना दिसून येत आहे. या सर्व गोष्टींवर काय उपाय करता येतील किंवा या गोष्टी जर घडल्याचं तर त्या कशा हाताळता येतील यासाठी आपण गायनॅकॉलॉजिस्ट ची नक्कीच मदत घेतली पाहिजे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे कोण आणि त्याचे मुख्य काम काय असते यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत.  गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे काय? (What does mean by Gynecologist?) वैद्यकीय शाखेमध्ये जशा वेगवेगळ्या शाखा असतात तशीच ही एक शाखा आहे.  गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोग तज्ञ. ज्यावेळी एखाद्या स्त्री ला प्रसूती बद्दल किंवा मासिक धर्माबद्दल काही शंका असतील त्रास असेल तर तिला गायनॅकॉलॉजिस्ट कडे जावे लागते. सर्वप्रथम जेंव्हा एखादी स्त्री गायनॅकॉलॉजिस्ट कडे जाते त्यावेळी तिला संकोच वाटू शकतो. डॉक्टरांशी काय बोलावे? कसे बोलावे किंवा? डॉक्टर काय प्रश्न विचारतील? या बद्दल शंका असतात. स्त्रियांना याविषयी मोकळेपणे बोलण्यास लाज वाटते. पण त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट ला आजराच्या मुळाशी जाण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सर्व शंका विचाराव्यात जेणे करून आपल्या आजराचे योग्य ते निदान होऊन चांगले उपचार होतील. .  गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यासाठी यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व  त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच  गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात.  स्त्रियांमधील आजार: गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रियांमधील विविध आराजांवर उपचार करतात. खाली काही आजारांची नावे नमूद केलेली आहेत ज्यांचा उपचार गायनॅकॉलॉजिस्ट करतात.  गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical cancer) गर्भाशयाचा कर्करोग (Uterine cancer) बीजांडाचा कर्करोग (Ovarian cancer) गर्भाशय सरकणे (Uterine prolapse) गर्भनलिकांचे आजार (Fallopian tube disease) गायनॅकॉलॉजिस्ट चे काम काय असते? (What does a Gynecologist do?) जसे की आपण वरती नमूद केले आहे की गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व  त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच  गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात. आजच्या आधुनिक युगामध्ये विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजि वापरून स्त्रीरोग तज्ञ हे आजारांचे निदान करतात.  ज्यावेळी आपण एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे जातो त्यावेळी सर्वप्रथम सोनोग्राफी करण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ञ देतात किंवा काही गायनॅकॉलॉजिस्ट हे स्वतःच सोनोग्राफी करत रुग्णाची तपासणी करतात वर आजाराचे निदान करतात. आजार जसा असेल त्यानुसार अजून काही तपासण्याची गरज असेल तर डॉक्टर त्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. योग्य निदान व उपचार मिळवण्यासाठी गायनॅकॉलॉजिस्ट ज्या तपासण्या करण्यास सांगतात त्या सर्व तपासण्या करणे अनिवार्य असते.  गायनॅकॉलॉजिस्ट चे शिक्षण काय असते? (Education of Gynecologist) गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून जेंव्हा एखादा डॉक्टर काम करत असेल तर त्याचे शिक्षण हे मुख्यतः M.B.B.S.  M.D. असे असते. त्याचप्रमाणे D.N.B. हा तीन वर्षांचा डिग्री कोर्से देखील केल्या जातो. ज्या गायनॅकॉलॉजिस्ट ची प्रॅक्टिस खूप जास्त असते असा गायनॅकॉलॉजिस्ट सर्वानुमते जास्त प्रमाणात उपचारांसाठी निवडल्या जातो. त्यामुळे डिग्री बरोबरच गायनॅकॉलॉजिस्ट ची असलेली प्रॅक्टिस हि खूप जास्त महत्वाची असते.  गायनॅकॉलॉजिस्ट कडे केंव्हा जावे? (When to go to Gynecologist?) ज्यावेळी स्त्री ला किँवा कोणत्याही नव्याने मासिक पाळी सुरु झालेल्या मुलीला आपल्या आरोग्य बद्दल काही शंका असतील काही त्रास असतील तर त्या स्त्रीने गायनॅकॉलॉजिस्ट कडे नक्की जावे. पण रूढपणे लग्न झाल्यानंतर प्रथम प्रसूती मध्ये काही अडथळे येत असतील किंवा गरोदरपणात स्त्रिया गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातात.  दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये आहारामध्ये होणारे अयोग्य बदल आणि फास्ट फूड चे वाढलेले प्रमाण यामुळे प्रजनन क्षमता व मासिक पाळीबद्दलचे आरोग्य खालावलेले दिसून येते. तज्ञांनुसार वाढलेले मोबाईल वापराचे प्रमाण देखील स्त्री च्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करताना दिसून येत आहे.  गायनॅकॉलॉजिस्ट कडे जाण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याव्यात. (Know these things before visiting a gynecologist) कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याआधी आपण काही बेसिक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. गायनॅकॉलॉजिस्ट बद्दल तर जाणून घेतलेच पाहिजे पण आपल्याला होणाऱ्या त्रास बद्दल ही व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे.  गायनॅकॉलॉजिस्ट ने मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे का? गायनॅकॉलॉजिस्ट ला त्याच्या क्षेत्रात किती अनुभव आहे. म्हणजेच गायनॅकॉलॉजिस्ट ची किती प्रॅक्टिस झालेली आहे.  रुग्णाने जाणून घ्यायच्या गोष्टी म्हणजे नेमका काय आणि कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे याबद्दल   नेमकेपणा असणे . गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेल्यावर काय विचारावे? (What to ask when visiting a gynecologist?) ज्यावेळी आपण सर्वप्रथम गायनॅकॉलॉजिस्टकडे जातो त्यावेळी आपल्याला काय त्रास होत आहे तो त्रास आधी गायनॅकॉलॉजिस्ट ला व्यव्यस्थितपणे न लाजता सांगावा. जेणे करून तुमच्या आजाराचे योग्य निदान होऊन गायनॅकॉलॉजिस्ट योग्य सल्ला देतील. खाली काही मुद्दे दिलेले आहेत जे कि आपण गायनॅकॉलॉजिस्ट ला विचारू शकतो.  जो त्रास होतोय त्यासाठी काय उपचार घ्यावेत  मुलींच्या मासिक पाळीवेळी काय काळजी घ्यावी.  नव्याने वयात आलेल्या मुलीला काय आरोग्य संबंधी काळजी घ्यावी तसेच स्वच्छता कशी राखावी  गरोदर मातांनी काय काळजी घ्यावी व कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा.  बाळंतपणा मध्ये काय काळजी घ्यावी.  स्तनदा मातांनी काय काळजी घ्यावी  अशा प्रकाच्या जर काही शंका तुम्हाला असतील तर त्या नक्कीच तुम्ही गायनॅकॉलॉजिस्ट ला मोकळेपणाने विचारू शकता.  गायनॅकॉलॉजिस्ट उपचार देताना कोण कोणत्या तपासणी पद्धतींचा वापर करतात? (Treatment ways used by gynecologists?) जेंव्हा आपण कोणत्याही गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातो त्यावेळी रुग्णाला काय त्रास होतोय त्यानुसार रुग्णाला तपासण्याची प्रणाली ठरवलं जाते. मुख्यतः कोणताही गायनॅकॉलॉजिस्ट सर्वप्रथम सोनोग्राफी करण्यास प्राधान्य देतो. कारण हा एकमेव असा मार्ग आहे ज्या द्वारे रुग्णाच्या पोटातील भागाचे परीक्षण करता येते. सोनाग्राफी केल्या नंतर च पुढे काय उपचार करावयाचे आहेत त्यावर गायनॅकॉलॉजिस्ट बोलू शकतात आणि त्यानुसार उपचाराची पद्धती व प्रणाली ठरवू शकतात.  इथे काही बेसिक उपचार पद्धती किंवा तपासणी पद्धती नमूद केलेल्या आहेत.  योनिमार्गाची तपासणी  स्पेक्युलमने तपासणी  गर्भाशयाच्या मुखाची पॅप स्मिअर  सोनोग्राफी  ए-क्सरे गायनॅकॉलॉजिस्ट च्या मते इंफर्टीलिटी म्हणजे काय? (What is According to a Gynecologist?) लग्न झाल्या नंतर काही महिन्यातच स्त्रीसमोर येणारा सर्वप्रथम प्रश्न म्हणजे आता कधी चान्स घेताय? हा एक असा प्रश्न आहे की कदाचित ज्याचे उत्तर तिला देखील ठाऊक नसते. कारण गोष्टी एवढ्या लवकर आणि अचानक होत असतात की काही वेळा तर एखादी स्त्री यासर्व बदलांसाठी तयार ही नसते. मग अशाप्रकारचे प्रश्न आणि आणि प्रेग्नन्सी प्लॅनिंग यात होणारे द्वंद्व हे स्त्रीला अघोषित प्रकारे किंवा अप्रत्यक्षपणे त्रासदायक ठरु शकते. एखाद्या महिलेचे वय

Ashtvinayak Hospital is the best superspeciality hospital in Panvel Navi Mumbai, offering expert care in cardiology, orthopedics, urology, and more. Your health is our priority!

Quick Links