स्त्री च्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई होणे. ज्यावेळी एखादी स्त्री ही आई होते तेंव्हा ती परिपूर्ण होते असे मानले जाते. पण आई होणे हे आजच्या धकधकीच्या आयुष्यात खूप कष्टप्राय झालेले दिसून येतेय. दिवसेंदिवस बदलणारी जीवनशैली, आहारपद्धती आणि वेगवान आयुष्य यामुळे स्त्रीचे आरोग्य हे दिवसेंदिवस खालावत जात असलेले दिसून येत आहे. आई होण्याची प्रक्रिया हि मुलगी वयात आल्यानंतर तिच्या मासिक धर्माची सुरुवात झाली की सुरु होते असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. पण बदलणाऱ्या जीवनशैली मुले मासिक धर्म सुरु होण्याचा वयोगट हा दिवसेंदिवस खाली येताना दिसून येत आहे. या सर्व गोष्टींवर काय उपाय करता येतील किंवा या गोष्टी जर घडल्याचं तर त्या कशा हाताळता येतील यासाठी आपण गायनॅकॉलॉजिस्ट ची नक्कीच मदत घेतली पाहिजे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे कोण आणि त्याचे मुख्य काम काय असते यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत.
वैद्यकीय शाखेमध्ये जशा वेगवेगळ्या शाखा असतात तशीच ही एक शाखा आहे. गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोग तज्ञ. ज्यावेळी एखाद्या स्त्री ला प्रसूती बद्दल किंवा मासिक धर्माबद्दल काही शंका असतील त्रास असेल तर तिला गायनॅकॉलॉजिस्ट कडे जावे लागते. सर्वप्रथम जेंव्हा एखादी स्त्री गायनॅकॉलॉजिस्ट कडे जाते त्यावेळी तिला संकोच वाटू शकतो. डॉक्टरांशी काय बोलावे? कसे बोलावे किंवा? डॉक्टर काय प्रश्न विचारतील? या बद्दल शंका असतात. स्त्रियांना याविषयी मोकळेपणे बोलण्यास लाज वाटते. पण त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट ला आजराच्या मुळाशी जाण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सर्व शंका विचाराव्यात जेणे करून आपल्या आजराचे योग्य ते निदान होऊन चांगले उपचार होतील. .
गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यासाठी यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात.
गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रियांमधील विविध आराजांवर उपचार करतात. खाली काही आजारांची नावे नमूद केलेली आहेत ज्यांचा उपचार गायनॅकॉलॉजिस्ट करतात.
जसे की आपण वरती नमूद केले आहे की गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात.
आजच्या आधुनिक युगामध्ये विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजि वापरून स्त्रीरोग तज्ञ हे आजारांचे निदान करतात. ज्यावेळी आपण एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे जातो त्यावेळी सर्वप्रथम सोनोग्राफी करण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ञ देतात किंवा काही गायनॅकॉलॉजिस्ट हे स्वतःच सोनोग्राफी करत रुग्णाची तपासणी करतात वर आजाराचे निदान करतात. आजार जसा असेल त्यानुसार अजून काही तपासण्याची गरज असेल तर डॉक्टर त्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. योग्य निदान व उपचार मिळवण्यासाठी गायनॅकॉलॉजिस्ट ज्या तपासण्या करण्यास सांगतात त्या सर्व तपासण्या करणे अनिवार्य असते.
गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून जेंव्हा एखादा डॉक्टर काम करत असेल तर त्याचे शिक्षण हे मुख्यतः M.B.B.S. M.D. असे असते. त्याचप्रमाणे D.N.B. हा तीन वर्षांचा डिग्री कोर्से देखील केल्या जातो. ज्या गायनॅकॉलॉजिस्ट ची प्रॅक्टिस खूप जास्त असते असा गायनॅकॉलॉजिस्ट सर्वानुमते जास्त प्रमाणात उपचारांसाठी निवडल्या जातो. त्यामुळे डिग्री बरोबरच गायनॅकॉलॉजिस्ट ची असलेली प्रॅक्टिस हि खूप जास्त महत्वाची असते.
ज्यावेळी स्त्री ला किँवा कोणत्याही नव्याने मासिक पाळी सुरु झालेल्या मुलीला आपल्या आरोग्य बद्दल काही शंका असतील काही त्रास असतील तर त्या स्त्रीने गायनॅकॉलॉजिस्ट कडे नक्की जावे. पण रूढपणे लग्न झाल्यानंतर प्रथम प्रसूती मध्ये काही अडथळे येत असतील किंवा गरोदरपणात स्त्रिया गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातात.
दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये आहारामध्ये होणारे अयोग्य बदल आणि फास्ट फूड चे वाढलेले प्रमाण यामुळे प्रजनन क्षमता व मासिक पाळीबद्दलचे आरोग्य खालावलेले दिसून येते. तज्ञांनुसार वाढलेले मोबाईल वापराचे प्रमाण देखील स्त्री च्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करताना दिसून येत आहे.
कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याआधी आपण काही बेसिक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. गायनॅकॉलॉजिस्ट बद्दल तर जाणून घेतलेच पाहिजे पण आपल्याला होणाऱ्या त्रास बद्दल ही व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे.
ज्यावेळी आपण सर्वप्रथम गायनॅकॉलॉजिस्टकडे जातो त्यावेळी आपल्याला काय त्रास होत आहे तो त्रास आधी गायनॅकॉलॉजिस्ट ला व्यव्यस्थितपणे न लाजता सांगावा. जेणे करून तुमच्या आजाराचे योग्य निदान होऊन गायनॅकॉलॉजिस्ट योग्य सल्ला देतील. खाली काही मुद्दे दिलेले आहेत जे कि आपण गायनॅकॉलॉजिस्ट ला विचारू शकतो.
अशा प्रकाच्या जर काही शंका तुम्हाला असतील तर त्या नक्कीच तुम्ही गायनॅकॉलॉजिस्ट ला मोकळेपणाने विचारू शकता.
जेंव्हा आपण कोणत्याही गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातो त्यावेळी रुग्णाला काय त्रास होतोय त्यानुसार रुग्णाला तपासण्याची प्रणाली ठरवलं जाते. मुख्यतः कोणताही गायनॅकॉलॉजिस्ट सर्वप्रथम सोनोग्राफी करण्यास प्राधान्य देतो. कारण हा एकमेव असा मार्ग आहे ज्या द्वारे रुग्णाच्या पोटातील भागाचे परीक्षण करता येते. सोनाग्राफी केल्या नंतर च पुढे काय उपचार करावयाचे आहेत त्यावर गायनॅकॉलॉजिस्ट बोलू शकतात आणि त्यानुसार उपचाराची पद्धती व प्रणाली ठरवू शकतात.
इथे काही बेसिक उपचार पद्धती किंवा तपासणी पद्धती नमूद केलेल्या आहेत.
लग्न झाल्या नंतर काही महिन्यातच स्त्रीसमोर येणारा सर्वप्रथम प्रश्न म्हणजे आता कधी चान्स घेताय? हा एक असा प्रश्न आहे की कदाचित ज्याचे उत्तर तिला देखील ठाऊक नसते. कारण गोष्टी एवढ्या लवकर आणि अचानक होत असतात की काही वेळा तर एखादी स्त्री यासर्व बदलांसाठी तयार ही नसते. मग अशाप्रकारचे प्रश्न आणि आणि प्रेग्नन्सी प्लॅनिंग यात होणारे द्वंद्व हे स्त्रीला अघोषित प्रकारे किंवा अप्रत्यक्षपणे त्रासदायक ठरु शकते. एखाद्या महिलेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि जर काही शारीरिक व्याधींमुळे किंवा मुळातच नैसर्गिकपणे संतती प्राप्ती साठी अडचणी येत असतील किंवा ६ महिने नियमितपणे गर्भधारणेसाठी प्रयत्न करून हि गर्भ धारणा होत नसेल तर त्यालाच इंफर्टीलिटी असे म्हणतात. ज्याला मराठी मध्ये आपण वंध्यत्व असे म्हणतो. WHO या संस्थेच्या अहवालानुसार जगभरात अंदाजे 48 दशलक्ष जोडपे हे वंध्यत्वा ने ग्रस्त आहेत. केवळ भारताचा विचार केला असता प्रत्येकी 6 जोडप्यामागे १ जोडप्यास वंध्यत्वाची समस्या आहे.
वयवर्षे ३५ पेक्षा जर तुमचे वय कमी असेल आणि तुम्हाला गर्भधारणा होऊ शकत नसेल तर वंध्यत्वाची लक्षणे असू शकतात. वंध्यत्व कसे जाणून घ्यावे याची काही लक्षणे तज्ञांनी सांगितली आहेत. स्त्री मधील वंध्यत्व लक्षणे आणि पुरुषांमधील वंध्यत्व लक्षणे हि वेगवेगळी असतात. स्त्रीरोग तज्ञांनुसार वंध्यात्वाची लक्षणे खालील प्रमाणे असतात.
IVF म्हणजेच In Vitro Fertilization हे माता-पिता होऊ इच्छिणाऱ्या परंतु गर्भ धारणेत अडचणी येत असणाऱ्या जोडप्यांसाठी खूप मोठे वरदान ठरलेले आहे. ज्या जोडप्यांनी आई बाबा होण्याची अपेक्षा सोडलेली असते त्या मातापित्यांची IVF हे खूप फायद्याचे तर ठरलेले आहेच परंतु सुखदायक ही ठरलेले आहे. याद्वारे तुम्ही वंध्यत्वाशी समर्थ पणे लढा देऊ शकता. जेंव्हा तुम्ही एखाद्या IVF सेंटर ला भेट देता तेंव्हा तुम्हला ये उपचार प्रणाली बद्दल योग्य माहिती असणे अनिवार्य असते. सुरुवातीला तुम्हाला या बद्दल भीती वाटणे स्वाभाविक आहे. परंतु योग्य माहिती, सल्ला आणि व्यवस्थित मार्गदर्शन हे तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते.
IVF उपचार हा बहुतेक वेळा वयवर्षे 40 पेक्षा जास्त वयाच्या व गर्भवती होण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांसाठी असतो. परंतु आजकालची जीवनशैली म्हणा किंवा काही अनुवांशिक कारणांमुळे म्हणा IVF हे खूप सामान्य झाले आहे. म्हणून, IVF साठी गायनॅकॉलॉजिस्ट ना केंव्हा भेटायचे या बद्दल रुग्णाने जागरूक असले पाहिजे. आयव्हीएफ हे कोणत्या परिस्थिती मध्ये करावे लागू शकते ते पाहू:
कोणती ही स्त्री जेंव्हा अष्टविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे तिच्या स्त्रीरोगविषयक आजरांसाठी निवडते म्हणजे तीने सर्व स्त्रीरोगविषयक गरजांसाठी सर्वसमावेशक, वैयक्तिक काळजी निवडलेली असते. अष्टविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे मुंबई मधील सर्वोत्तम स्त्रीरोग रुग्णालय का मानले जाते ते आम्ही येथे नमूद करत आहोत:
तज्ञ गायनॅकॉलॉजिस्ट(Expert gynecologist): अनुभवी, जाणकार आणि उत्तम स्त्रीरोग तज्ञांची असलेली आमची टीम महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि निरोगीपणासाठी समर्पित आहे.
प्रगत तंत्रज्ञान (Advanced technology): अचूक निदान आणि प्रभावी उपचार हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अष्टविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक निदान आणि उपचार साधने वापरतो.
सर्वसमावेशक सेवा (Comprehensive service): नियमित तपासणी ते प्रगत शस्त्रक्रिया, या सर्व प्रक्रिया आम्ही अष्टविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये एकाच छताखाली स्त्रीरोगविषयक सेवांची संपूर्ण श्रेणी ऑफर करतो.
रुग्ण-केंद्रित काळजी(Patient-centered care): आमच्या हॉस्पिटल मध्ये प्रत्येक रुग्णाच्या आवश्यक गरजांनुसार वैयक्तिकीकृत उपचार योजना प्रदान केल्या जातात. त्याही सर्वोत्तम परिणामांची खात्री करूनच.
नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून आम्ही स्त्रियांच्या आरोग्याच्या सर्व पैलूंसाठी उच्च दर्जाची काळजी देण्याचा प्रयत्न अष्टविनायक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नेहमीच करत आलेले आहे.
गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यासाठी यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात.