"Healthcare with Humane touch"

Ashtvinayak Helpline

जाणून घेऊया लॅपरोस्कोपी म्हणजे काय ? का व कशी केली जाते? तसेच लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेचे फायदे व सुरक्षितता.

प्रस्तावना (Introduction)

मानवाचे आरोग्य हे त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळेच म्हणले जाते “आरोग्यम् धनसंपदा”. असे म्हणले जाते की ज्या व्यक्तीचे पोटाचे आरोग्य चांगले असते ती व्यक्ती निरोगी असते. पोटाचे आरोग्य चांगले आहे हे आपल्याला सहजा सहजी कळत नाही. वर वर चांगले दिसणारे आरोग्य हे कधी कधी मोठ्या आजारांना निमंत्रण देते. पण पोटात झालेलं आजार हे वर पाहता दिसून येत नाहीत. त्यासाठी अंतर्गत तपासणी करावी लागते. व ही तपासणी म्हणजेच लॅपरोस्कोपी. 

आजच्या या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया जाणून घेऊया लॅपरोस्कोपी म्हणजे काय ? का व कशी केली जाते? तसेच लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेचे फायदे व सुरक्षितता. 

लॅपरोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे केली जाणारी पोटाची तपासणी व शस्त्रक्रिया. पूर्वी पोटाची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया हि पोट उघडून केली जायची. त्यामुळे पेशंटला म्हणजेच रुग्णाला बरेच टाके द्यावे लागायचे परिणामी रुग्णाला बराच त्रास होत असे व बराच काळ दवाखाण्यात राहावे लागायचे. पण आता लॅपरोस्कोपी मुळे ही सर्व प्रक्रिया आता खूप सुलभ आणि सुकर झाली आहे. दुर्बिणीद्वारे होणारी  ही  शस्त्रक्रिया रुग्णाच्या वेदना तर कमी करतेच परंतु त्याचे दवाखान्यातील वास्तव्य देखील कमी करते. लॅपरोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रियेमध्ये पोटाला लहानसा छेद करावा लागतो त्यामुळे रुग्णाला खूप कमी वेदना होतात.

लॅपरोस्कोपी ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की ज्याद्वारे पोटाच्या आतील अवयवांची तपासणी केली जाते व ऑपरेशन देखील केले जाते. लॅपरोस्कोपी या शस्त्रक्रियेचा उपयोग हा आजाराच्या निदानासाठी, पोटातील अंतर्गत अवयव पाहून किंवा बायोप्सी करून केला जाऊ शकतो. लॅपरोस्कोपी ही एकाच वेळी आजाराचे निदान करून शस्त्रक्रियेद्वारे समस्येवर उपचार करण्यासाठी केला जातो.

लॅपरोस्कोपी ही नेहमी एका निष्णात सर्जन कडूनच करावी. लॅपरोस्कोपी करताना सर्वप्रथम रूग्णाला सामान्य भूल दिली जाते. त्यानंतर सर्जन रुग्णाच्या नाभी जवळ एक इंच लांब किंवा त्याही पेक्षा लहान असा छेद करतो. केलेल्या छेदाद्वारे शल्यचिकित्सक हा लांब व पातळ अशी ट्यूब रुग्णाच्या पोटा  मध्ये सोडतो. या ट्यूबलाच लॅप्रोस्कोप असे म्हणतात. या ट्यूब ला एक कॅमेरा जोडलेला असतो जो की बाहेर मॉनिटरशी अटॅच केलेला असतो. हा कॅमेरा तुमच्या पोटाच्या आतील भागाचे निरीक्षण करून त्याचे फोटो हे बाहेर असलेल्या मॉनिटर वर पाठवतो. या फोटोंच्या आधारेच शल्यचिकित्सक रुग्णाच्या आजाराचे निदान व उपचार करतो.

लॅपरोस्कोपी द्वारे उपचार केले जाणारे आजार (Diseases treated by laparoscopy)

लॅपरोस्कोपी द्वारे पोटाच्या आतील विविध आजारांचे निदान व उपचार केले जातात. पुढे काही आजारांची नावे दिलेली आहेत ज्यांची लॅप्रोस्कोपी केली जाते.

  1. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया

  2. हायटस हर्निया

  3. इनगिनल हर्निया

  4. हेपेटोबिलरी

  5. स्वादुपिंडाचा आजार

  6. स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया


या आजचे निदान व उपचार लॅपरोस्कोपी द्वारे केले जातेच परंतु याशिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर यांसारख्या व  इतर अवयवांवर देखील
लॅप्रोस्कोपी द्वारे शस्त्रक्रिया करण्यात येते.

लॅपरोस्कोपी  शस्त्रक्रियेचा वापर हा बहुतेक करून आतड्यांसंबंधी असणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. खाली काही शस्त्रक्रियांची उदाहरणे दिली आहेत. 

  1. क्रॉन्स डिसीज
  2. अल्सरेटिव्ह कोलायटिस 
  3. डायव्हर्टिकुलिटिस 
  4. कॅन्सर 
  5. रेक्टल प्रोलॅप्स 
  6. गंभीर बद्धकोष्ठता

या अशा विविध शस्त्रक्रियांचा समावेश हा लॅप्रोस्कोपी मध्ये केलेला आहे.

लॅपरोस्कोपी ही फक्त शस्त्रक्रिया च नाहीए तर त्यामुळे पोटाची अंतर्गत तपासणी देखील केली जाते. त्यामुळे पोटाच्या विकारांचे निदान होते. खाली काही विकारांची नावे दिली आहेत ज्यांची लॅपरोस्कोपीमुळे निदान होते. 

  •    एंडोमेट्रिओसिस
  •   गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स
  •   डिम्बग्रंथि सिस्ट किंवा ट्यूमर
  •   एक्टोपिक गर्भधारणा
  •   ओटीपोटात पस होणे
  •   वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी 
  •   ओटीपोटाचे आजार 
  •   कर्करोग

लॅपरोस्कोपी ही फक्त शस्त्रक्रिया च नाहीए तर त्यामुळे पोटाची अंतर्गत तपासणी देखील केली जाते. त्यामुळे पोटाच्या विकारांचे निदान होते. खाली काही विकारांची नावे दिली आहेत ज्यांची लॅपरोस्कोपी निदान होते.

जसे आपण वरती पाहिले की लॅपरोस्कोपी या शस्त्रक्रियेमुळे शरिराला कमीत कमी छेद दिल्या जातो. त्यामुळे  रुग्णाला लवकर आराम मिळतो व तो दैनंदिन कामास शक्य तितक्या लवकर सुरुवात करू शकतो. या शस्त्रक्रियेचे काही वाखाणण्या जोगे फायदे आहेत. ते फायदे आपण पाहू. 

लॅपरोस्कोपी रुग्णाचा रक्त्तस्त्राव कमी होतो. फुफ्फुसाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होते. आतड्यांचे कार्य योग्यपद्धतीने चालते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर कमी वेदना जाणवतात. जखम लवकरात लवकर भरुन येते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत नाही. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन दैनंदिन काम करु शकतो. ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत लॅपरोस्कोपी नंतर रुग्णाला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी असते.

लॅपरोस्कोपि ही शस्त्रक्रिया पारंपारिक ओपन सर्जरी एवढीच सुरक्षित आहे . लॅपरोस्कोपि च्या  सुरूवातीस, पोटाच्या नाभी जवळ (अंबिलिकस) लहान चीर दिली जाते. व त्या व्दारे रुग्णाच्या पोटामध्ये  लॅपरोस्कोप सोडला जातो. लॅपरोस्कोपि ही सुरक्षितपणे होऊ शकते की नाही हे निर्धारित करण्यासाठी शल्यचिकित्सक सुरुवातीला पोटाची संपूर्णपणे तपासणी करून घेतो.

पारंपारिक शस्त्रक्रिया म्हणजेच ज्याला ओपन सर्जरी म्हणूनही ओळखले जाते, शस्त्रक्रियेचा हा प्रकार शतकानुशतके मेडिकल फिल्ड मध्ये वापरल्या जात आहे. यात शस्त्रक्रिया करण्याच्या नेमक्या भागावर पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात शरीराला चीरे देणे समाविष्ट आहे. दुसऱ्या बाजूला, 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या लेप्रोस्कोपि या शस्त्रक्रियेमध्ये शरीराला लहान चीरे करणे आणि त्याद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीराद्वारे कॅमेरा आणि विशेष उपकरणे सह्रीरामध्ये सोडणे समाविष्ट आहे.

लॅपरोस्कोपी आणि पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये असणारे कमी ठळक फरक आपण पाहुयात. ते खालील प्रमाणे आहेत. 

तंत्र आणि प्रक्रिया (Techniques and Procedures)

लॅपरोस्कोपी हि लहान अशा दुर्बिणीद्वारे केली जाते तर ओपन सर्जरी मध्ये शरीराला चिरा दिल्या जातात. ज्यामुले झालेल्या जखमा भरून येण्यासाठी वेळ लागतो. 

पूर्ववत होण्यासाठी लागणार वेळ आणि रुग्णालयात मुक्काम (Recovery time and hospital stay)

लॅपरोस्कोपीमुळे रुग्णाला कमी वेदना होतात व कमी चिरफाड असल्यामुळे रिकव्हरी देखील लवकर होते परिणामी रुग्णाला असत काळ रुग्णालयात राहावे लागत नाही व दैनंदिन कामकाजास लवकरात लवकर सुरुवात करता येते. 

जोखीम आणि गुंतागुंत (Risks and complications)

लॅपरोस्कोपि मध्ये लहान लहान चीरा असतात त्यामुळे संसर्ग आणि हर्निया यासारखी  गुंतागुंत होण्याचा धोका कमी असतो. पारंपारिक शस्त्रक्रिया म्हणजेच ओपन सर्जरी ही अधिक आक्रमक असून ही ,त्यात असणारी जोखीम ही रुग व सर्जन यादोघांनाही माहिती असते. तसेच ही एक सुस्थापित पद्धती आहे. विविध फिल्ड मध्ये अनुभव असणाऱ्या सर्जन्स ने ही पद्धती स्वीकारली आहे.

पेशंटचे परिणाम आणि समाधान (Patient outcomes and satisfaction)

तज्ज्ञांच्या अभ्यासा अंती असे निदर्शनास आले आहे की लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला आरोग्यात होणारे परिणाम आणि समाधान सामान्यतः जास्त आहे. शस्त्रक्रिये नंतर कमी डाग, दानदिन कामे लवकर सुरु होणे आणि शस्त्रक्रियेनंतर होणारी वेदना पातळी कमी होते. पारंपारिक शस्त्रक्रिया, ही प्रभावी आहे परंतु , रुग्णाला  बरे होण्यास जास्त कालावधी लागतो व शरीरावर शस्त्रक्रियेचे डाग अधिक दिसून येतात. 

खर्च-प्रभावीपणा (Cost-effectiveness)

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी अधिक महाग उपकरणे वापरली जातात आणि ऑपरेशन दीर्घ काळ चालू शकते , ज्यामुळे खर्च वाढू शकतो. परंतू , रूग्णालयातील कमी वास्तव्य आणि कामावर लवकर परतणे या गोष्टी या खर्चाची भरपाई  नक्कीच करू शकतात.

लॅपरोस्कोपी जरी सोपी आणि लवकर आराम देणारी प्रणाली असली तरी देखील शेवटी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही बदल झालेले असतात. ते बदल शरीराने लवकरात लवकर स्वीकारण्यासाठी काही आहार नियम म्हणजेच पथ्ये पाळणे कधी हि चांगले जसे की: 

वाळलेले/निर्जलीकरण केलेले खाद्य (Dried/dehydrated food) :

 निर्जलिकरण केले पदार्थ म्हणजे ज्यामधून पाण्याचा अंश हा पूर्णतः काढून टाकेलला आहे असे पदार्थ. जसे की गोमांस , ड्रायफ्रूट्स , बटाटा चिप्स व इतर काही पदार्थ.

दुग्धजन्य पदार्थ (Dairy products):

दूध व इतर चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की आंबट मलई आणि आइस्क्रीम टाळावे. 

मिठाई (sweets):

चॉकलेट्स, कॅंडीज, केक, पेस्ट्री खाणे तर टाळावेच तसेच अतिप्रमाणात साखर असलेली मिठाई टाळण्याचा प्रयत्न करा.

लॅपरोस्कोपी  करायची असेल तर योग्य हॉस्पिटल आणि निष्णात सर्जन यांची निवड करणे खूप आवश्यक ठरते. मुंबई मधील अष्टविनायक हॉस्पिटल हे लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी नावाजलेल्या  रुग्णालयांपैकी एक आहे. लाप्रिस्कॉपीसाठी अष्टविनायक हॉस्पिटल काय सुविधा देते ते इथे पाहू.

तज्ञ शल्यचिकित्सक (Specialist surgeon):

अष्टविनायक हॉस्पिटल च्या शल्यचिकित्सकांमध्ये मुंबईतील काही सर्वोत्कृष्ट लॅपरोस्कोपीक शल्यचिकित्सकांचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्हाला उच्च-स्तरीय शस्त्रक्रियेचि काळजी मिळते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान (Advanced technology):

बिनचूक आणि अतिशय परिणामकारक प्रक्रिया सुनिश्चित करण्यात यावी यासाठी  अष्टविनायक हॉस्पिटल येथे आम्ही प्रगत लॅपरोस्कोपी उपकरणे आणि तंत्रज्ञान यांचा वापर करतो. 

कमीतकमी रिकव्हरी (Minimal recovery):

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये पोटाला अगदीच लहान चीरे दिले गेले असल्याने, पेशंटला पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रिकव्हरी साठी अगदीच कमी तर लागतोच पण वेदना देखील कमी होतात. 

सर्वसमावेशक काळजी (Comprehensive care):

अष्टविनायक हॉस्पिटल येथे आम्ही अगदी सुरुवाती ला दिलेल्या सल्ल्यापासून ते परस्टीन झाल्यानंतर रिकव्हरीपर्यंत, आम्ही प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार त्याला वैयक्तिक काळजी प्रदान करतो.

रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन (A patient-centered approach):

अष्टविनायक हॉस्पिटल येथे आम्ही प्रत्येक पेशन्ट साठी वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यावर विश्वास ठेवतो, पेशण्टच्या आरामाची आणि सर्वोत्तम संभाव्य परिणामांची खात्री करतो.

कमीत कमी आक्रमक तंत्रांमध्ये वर्षानू वर्षांचा अनुभव आणि स्किल्स असलेल्या, अष्टविनायक हॉस्पिटलला मुंबई मधील लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी असलेले एक अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जाते याचा आम्हाला व आमच्या टीम ला सार्थ अभिमान आहे.

निष्कर्ष (Conclusion):

लॅपरोस्कोपी ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की ज्याद्वारे पोटाच्या आतील अवयवांची तपासणी केली जाते व ऑपरेशन देखील केले जाते. लॅपरोस्कोपी या शस्त्रक्रियेचा उपयोग हा आजाराच्या निदानासाठी, पोटातील अंतर्गत अवयव पाहून किंवा बायोप्सी करून केला जाऊ शकतो. लॅप्रोस्कोपी ही एकाच वेळी आजाराचे निदान करून शस्त्रक्रियेद्वारे समस्येवर उपचार करण्यासाठी केला जातो.

Ashtvinayak Hospital is the best superspeciality hospital in Panvel Navi Mumbai, offering expert care in cardiology, orthopedics, urology, and more. Your health is our priority!

Quick Links