वैद्यकशास्त्रा मधे विविध शाखा असतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. नेफ्रोलॉजी ही देखील वैद्यक शास्त्रातील एक शाखा आहे. नेफ्रोलॉजी ही शाखा मूत्रपिंड म्हणजेच किडनीशी संबंधित आहे. ज्यात किडनी सम्बंधित आजारांवर उपचार केले जातात. ज्या वेळी किडनी हा अवयव आपल्या समोर येतो त्यावेळी आपल्याला डायलिसिस ही एकच उपचार पद्धति डोळ्यांसमोर येते. पण डायलिसिस ही एकच उपचार पद्धति किडनीशी सम्बंधित नाहीए तर अजुन ही काही उपचार व आजार मूत्रपिंडाशी निगडित आहेत. मुख्यतः नेफ्रोलॉजी म्हणजे काय? मूत्रपिंडाचे आजार त्याची लक्षणे आणि त्यावरचे उपाय हेच या आजच्या ब्लॉग मधे आपण पाहणार आहोत.
मानवाच्या शरीरात विविध घटक असतात. काही चांगले तर काही वाईट, जे वाईट घटक असतात त्यांना आपन टॉक्झिन्स म्हणतो. जे की आपल्या लघवी वाटे बाहेर पडतात. लघवी वाटे टॉक्सिन्स बाहेर पडण्याचे काम जर व्यवस्थितपणे पार पड़त नसेल म्हणजेच किडनीचे फंक्शनिंग व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला नेफ्रोलॉजिस्ट कड़े जावे लागते.
अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित नेफ्रोलॉजिस्टशी संपर्क साधावा. वेळेत उपचार घेतले असता चांगले आणि योग्य निदान होण्याशी शक्यता वाढते.
हा एक असा आजार आहे जो दीर्घकाळ टिकतो. सामान्यपणे मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांमधे हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. यात सुरुवातीला कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत पण योग्य उपचाराने त्रास दूर करता येतो.
लक्षणे :-
किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा यात क्षाराचे खड़े होतात ज्यामुळे पोट दुखणे लघवीस त्रास होणे अशी याची सामान्यपणे लक्षण असतात. वाईट जीवनशैली , लठ्ठपणा , डायबिटीज , अनियंत्रित आहार यामुळे किडनी स्टोन होतो.
लक्षणे :-
जगभरात अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की मधुमेह असणाऱ्या लोकाना मूत्रपिंडाचे आजार होतात. ज्या लोकांची शुगर नियंत्रणात नसते अशा लोकाना मधुमेह होतो.
लक्षणे :-
ज्याप्रमाणे मधुमेहामुळे किडनी चे आजार उदभवतात त्याप्रमाणेच हायब्लड प्रेशर मुळे ही किडनीचे आजार होतात. हायपरटेन्सिव्ह नेफ्रोस्क्लेरोसिस आजारामध्ये उच्च रक्तदाबामुळे किडनीतील रक्तवाहिन्या खराब होतात त्यामुळे किडनीचे कार्य खराब होते. म्हणजेच अनावश्यक द्रव रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्तदाब आणखी वाढतो.
लक्षणे :-
Urinary tract infection म्हणजेच मूत्रमार्गातील संसर्गामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतोच असे नाही. पण मूत्रमार्गात झालेला संसर्ग जर लवकर उपचाराविना राहिला तर तो संसर्ग किडनी पर्यंत पोहचू शकतो आणि किडनीचे काम व्यवस्थितपणे पार पडत नाही. यात मूलतः दिसून येणारे लक्षण म्हणजेच मुत्रमार्गात आग होणे .
लक्षणे :-
हा आजार अनुवांशिक असू शकतो. पॉलीसिस्टिक किडनी डिसीज मधे मूत्रपिंडात गाठी होतात. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या वाढतात आणि किडनी निकामी होण्यास सुरुवात होते.
लक्षणे :-
हा आजार शक्यतो लहानपणी किंवा पौगंडावस्थेत सुरु होतो. याची लक्षणे म्हणजे मूत्रविसर्जनावेळी लघवीवाटे रक्त पडणे.
किडनी फेल होणे म्हणजे मूत्रपिंडाचे काम हे १००% हुन १०% वर येणे. यात ५ स्टेज असतात ज्यात सुरुवातीच्या ४ टप्प्यात काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यावेळी किडनी पूर्णतः काम करणे बंद करते तेंव्हाच लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
लक्षणे :-
आपल्या रक्तात साठून राहिलेल्या टॉक्सिन्स ला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. किडनीचे मुख्य कामच रक्तातील दूषित पदार्थ बाहेर टाकण्याचे आहे. ज्यावेळी किडनी हे काम नैसर्गिक रित्या करू शकत नाही त्यावेळी आपलयाला डायलिसिस ची गरज पडते . ज्यावेळी किडणीचे फंक्शनिंग हे १००% हुन १० टक्क्यांवर येते तेंव्हा डायलिसिस करावे लागते.
1. Hemodialysis – Hemodialysis याचा अर्थ रक्तातील Dialysis. Hemodialysis – Hemodialysis means dialysis of blood.
या प्रक्रियेमधे शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकले जातात. या मधे एक नलिका रुग्णाच्या vein मध्ये टाकली जाते. नलिकेच्या एका टोकातून रक्त बाहेर काढले जाते जे filter मधून pass होते आणि शुद्ध केलेले रक्त परत दुसऱ्या टोकातून आपल्या शरीरात जाते .ही प्रक्रिया ४ ते ६ तासांची असते. ज्या रुग्णाची किडणी १०% पेक्षा कमी काम करत असेल तर त्या रुग्णाला आठवड्यातून २-३ वेळा dialysis करावे लागते . या प्रकारचं डायलिसिस हे बहुतेक वेळा कायम स्वरूपाचे असते .
2. Peritoneal Dialysis – Peritoneal डायलिसिस म्हणजे पाण्याचा Dialysis. Peritoneal Dialysis – Peritoneal dialysis means Dialysis of water.
या प्रकारच्या डायलिसिस मध्ये बेंबी च्या खाली एक छिद्र केले जाते आणि त्यामधून एक catheter शरीरात टाकल्या जातो. जवळ पास एक विशीष्ठ प्रकारचे 2 लिटर पाणी हे या catheter च्या माध्यमातून पोटात सोडले जाते. या पाण्याद्वारे Peritoneal कॅव्हिटी ला लागून ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामधून दूषित पदार्थ शोषून घेल्या जाते . हे पाणी आत जाण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. पाणी आत गेल्यानंतर हे पाण्याची पिशवी catheter पासून disconnect करतो. पुढचे ४ ते ६ तास हे पाणी आत असते. ४ ते ६ तासानी हे पाणी शरीरा बाहेर काढले जाते. ज्यावेळी हे पाणी बाहेर काढले जाते त्यावेळी peritoneal dialysis catheter cost of dialysis ला पुन्हा रिकामी पिशवी जोडून ते पाणी बाहेर काढावे लागते.
Hemodialysis हे आठवड्यातून २ ते ३ वेळा करावे लागते तर Peritoneal dialysis दिवसातून २ ते ३ वेळा करावे लागते . जर Peritoneal dialysis चे योग्य प्रशिक्षण घेतले तर घरी देखील करता येऊ शकते. .
डायलिसिस करण्याचा खर्च हा त्या त्या सेंटर नुसार वेगवेगळा असतो. त्या सेंटर वर उपलब्ध असणाऱ्या सुविंधांवर हा खर्च अवलंबून असतो.
ज्या व्यक्तीचे मूत्रपिंडाचे कार्य 10% पेक्षा कमी आहे त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपण आवश्यक आहे.मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड 15% कार्य करत असल्यास, त्याला प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे.
प्रत्येकजण रुग्णाला किडनी दान करू शकत नाही. सर्वप्रथम दोघांचे रक्तगट समान आहेत की नाही हे तपासावे लागेल. जर ते जुळले तर पांढऱ्या रक्तपेशींचे फ्यूज झाले पाहिजे. हे टिश्यू टायपिंग नावाच्या चाचणीद्वारे तपासले जाते.
साधारणपणे १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती रुग्णाला किडनी देऊ शकते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडनी देऊ शकतात. जर ते जुळी भावंडे असतील तर त्यांना आदर्श किडनी दाता मानले जाते, परंतु हे फार दुर्मिळ आहे.
नेफ्रोलॉजी ही देखील वैद्यक शास्त्रातील एक शाखा आहे. नेफ्रोलॉजी ही शाखा मूत्रपिंड म्हणजेच किडनीशी संबंधित आहे. ज्यात किडनी सम्बंधित आजारांवर उपचार केले जातात. लघवी वाटे टॉक्सिन्स बाहेर पडण्याचे काम जर व्यवस्थितपणे पार पड़त नसेल म्हणजेच किडनीचे फंक्शनिंग व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला नेफ्रोलॉजिस्ट कड़े जावे लागते.