"Healthcare with Humane touch"

Ashtvinayak Helpline

जाणून घ्या "ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय". ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि हाडांच्या संबंधित आरोग्याची महत्त्वाची माहिती

ऑर्थोपेडिक्स हि एक मेडिकल मधील शाखा आहे . जसे गायनॉकॉलॉजिस्ट असतात हार्ट प्सेशालिस्ट असतात असेच ऑर्थोपेडिक्स असतात. ऑर्थोपेडिक्स म्हणजे कोण तर सरळ सरळ भाषेमध्ये सांगायचे झाले तर हाडां च्या आजराशी संबंधित असलेला डॉक्टर. ऑर्थोपेडीक्स मध्ये मुळात २ प्रकार असतात .

१. सर्जिकल

२ नॉन-सर्जिकल

सर्जिकल ऑर्थोपेडिक्स हे सर्जिकल इंटरव्हेशन मध्ये स्पेशलिस्ट असतात तर नॉन सर्जिकल फिजिओ थेरेपी सारख्या प्रणाली मध्ये स्पेशालिस्ट असतात. नॉर्मली बर्थोपेडिक्स हे एका टीम मध्ये काम करतात . त्यात फयजिशिअन, थेरपिस्ट, प्रॅक्टिशनर्स, व्यावसायिक, तसेच खेळाडूंचे ट्रेनर समाविष्ट असतात.

ऑर्थोपेडिक डॉक्टर्स हे रुग्णाला पूर्णपणे आराम पडावा यासाठी उपचारावर पूर्णतः लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. मेडिकल फिल्ड मध्ये जश्या बाकीच्या ब्रॅंचेस असतात तशीच ऑर्थोपिडेक्स हि एक ब्रांच आहे. ऑर्थोपिडिक्स हे हाडांच्या संबंधित असणाऱ्या आजारांवर उपचार करतात. मानवीय शरीरामध्ये एकूण २०६ हाडे असतात . यातील प्रत्येक हाडाची साईज व नाव वेगवेगळी असतात .  या सगळ्यांना मिळून आपल्या शरीराचे स्केलेटन बनते. या पूर्ण स्केलेटन सिस्टीम च्या संबंधित भागांची काळजी घेण्याचं काम ऑर्थोपेडिक्स करतात.

जेव्हां आपण एखाद्या ऑर्थोपेडिक्स कडे जातो तेंव्हा सुरुवातीला आपल्याला काय त्रास होतोय हे डॉक्टरांना सांगावे . त्यानुसार रुग्णाच्या परिस्थितीचा अंदाज डॉक्टरांना येतो. रुग्ण जे काही सांगतो त्यानुसार त्याच्या आजराचा त्रासाचा डॉक्टरांना अंदाज येतो आणि त्याचे विस्तृतपणे परीक्षण आणि शारीरिक मूल्यांकन आणि ए-क्सरे समाविष्ट असतात. बरेचदा ऑर्थोपेडिक्स च काम हे मूलतः ए-क्सरे वर अवलंबून असते. ज्यात रुग्णाची सद्य स्थिती पूर्णपणे दिसून येते .

काही वेळेस रुग्णाचे परीक्षण करताना ऑर्थोपेडिक्स सेंटर वर आल्यावर अल्ट्रा साऊंड स्कॅन करतात ज्यामुळे त्यांना काही विशिष्ट परिस्थीचे परीक्षण करायला परवानगी मिळते. जर रुग्णाच्या चिकित्से मध्ये कुठे सूज आढळली तर कॉर्टिकोस्टेरॉयड इंजेक्शन सारखे इंजेकशन्स पण ऑर्थोपेडिक्स डॉक्टर देऊ शकतात . अपघात झाला असेल किंवा कोणत्या कारणामुळे काही गंभीर जखमा झाल्या असतील फ्रॅक्चर असेल किंवा सांधे , ऑर्थोपेडिस्ट हाडे किंवा  जॉईंट कास्टिंग प्लास्टरिंग किंवा ब्रेसिंग या उपचारांचा वापर करून उपचार करतात.

ऑर्थोपेडिक मध्ये अजून काही शाखांचा समावेश आहे ज्यात ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कोणत्या हि एका शाखेत प्राविण्य मिळवतात . खाली काही ऑर्थोपेडिक्स शाखांची उदाहरणं आहेत

या शाखेतील ऑर्थोपेडिक्स हे  हात, मनगट, दंड, खांदे यांच्यावर उपचार करतात .

पाय आणि पायाचे इतर भाग (Foot and other parts of the foot) :

या शाखेतील ऑर्थोपेडिक्स हे पाय आणि पायाशी निगडीत असलेल्या भागांवर उपचार करतात ज्यात जखमा, अपंगत्त्व आणि प्लास्टर यांचा समावेश असतो .

स्पोर्ट्स मेडिसिन (Sports Medicine) :

या शाखेतील ऑर्थोपेडिक्स हे खेळाडूंच्या उत्तमोत्तम कामगिरीसाठी मदत करतात. म्हणजे जर एखाद्या खेळाडुला खेळताना जर काहि दुखापत झाली तर त्यातून तो लवकरात लवकर कसा बरा होईल याची काळजी हे ऑर्थिपेंडिक्स डॉक्टर्स घेतात .

स्पाइन सर्जरी (Spine surgery) :

मणक्यातील काही ऍबनॉर्मल आणि परिस्थितींच परीक्षण करते आणि मणक्याशी संबंधित समस्यांसाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर तो सल्ला देण्याचं काम या शाखेतील डॉक्टर्स करतात.

ट्रॉमा सर्जरी (Trauma surgery) :

या शाखेतील ऑर्थोपेडिक्स हे अपघातामुळे होणाऱ्या गंभीर जखमांचा उपचार करतात.

ऍडव्हांस आरोग्य सेवा (Advance health care) :

असे बरेचसे ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटल्स आहेत जे रुग्णानाला खूप चांगल्या प्रकारे सल्ला देतात आणि ऍडव्हान्स टेकनॉलिजि चा वापर करतात.

जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी (Joint Replacement Surgery) :

जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा आर्थ्रोप्लास्टी, यात खराब झालेल्या सांध्याचे डाग पडलेले पृष्ठभाग काढून टाकले जातात आणि नैसर्गिकरित्या निरोगी सांध्यांचे कार्य सुरळीत पणे करण्यासाठी कृत्रिम अवयवाने बदलले जातात.

आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिये मध्ये कमीत कमी त्रास होईल अशी हि शस्त्रक्रिया आहे . यात सांध्यांच्या समस्यांचे निदान केले जाते .आर्थ्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ असा कॅमेरा कॅमेरा असतो अगदी एखाद्या बटनहोलच्या आकाराचा जो ऑर्थोपेडिक सर्जन ला  एखाद्या व्यक्तीच्या सांध्यामध्ये चिकटवता येतो. मुख्यतः गुडघा किंवा खांद्यावर. हा कॅमेरा व्हिडीओ मॉनिटरला जोडल्या जातो ज्यामुळे डॉक्टरांना जॉइंट्सच्या आतील भागाचे परीक्षण करता येते . तसेच छोट्या छोट्या चिरा बनवण्यासाठी आणि आणखी काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी द्रव-आधारित उत्तेजनासह विविध लहान आणि पातळ साधने वापरतात. आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही अगदी सामान्य सांधे दुखापती दुरुस्ती करण्यासाठी सर्वात सामान्य पद्धत आहे जसे की मुरगळणे , ACL जखम आणि रोटेटर कफ इजा. ऑर्थोस्कॉपी सर्जरी नंतर पूर्वपदावर येण्यासाठी रुग्णाला एक आठवडा ते काही महिने लागू शकतात. आर्थ्रोस्कोपीनंतरच्या वैद्यकीय उपचारांवर अवलंबून, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे बरे होण्यासाठी एका आठवड्यापासून कित्येक महिने लागू शकतात.

कोणत्याही ऑर्थोपेडिक सर्जन कडे जाण्यापूर्वी तो तो मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे का ? आणि त्याला मिळालेली डिग्री हि खरी आहे का याची चौकशी करावी. तसेच त्याचे यापूर्वीचे कार्य हि चौकशी व्दारे तपासून घ्यावे. खाली दिलेले काही मुद्दे देखील तपासून पाहावेत

१ ऑर्थोपेडिकस मध्ये पूर्ण स्वरूपाने अभ्यास पूर्ण केलेला असावा. 

IOA आणि IOS ने प्रमाणित केलेला असावा. 

३. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विद्यार्थी असावा. 

४. शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले असावे तसेच योग्य तो अनुभव हि असावा.

५. वैद्यकीय शिक्षण, शिस्त, रुग्णाची सुरक्षा आणि कठोर नैतिकतेचे पालन करणारा असावा.

योग्य तो ऑर्थोपेडिक सर्जन मिळवण्यासाठी तुम्ही IOS आणि IOS या दोन्ही वेबसाइट चा उपयोग होतो.

ऑर्थोपेडिक्सउपचार कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय करता येतात का? तर हो. आजच्या या टेकनॉलॉजि च्या युगात आपण हाडांच्या विकारांवर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता देखील उपचार करू शकतो. या पद्धतीला मॅग्नेटिक रेझोनन्स असे म्हणतात. ज्याला मराठी मध्ये चुंबकिया अनुनाद असे देखील म्हणतात. हि जी उपचार पद्धती आहे ती फिजिओ थेरेपिशी निगडित आहे. या उपचार पद्धतीचे म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स याचे पेटंट हे MBST खाली घेण्यात आलेय. ही एक सर्वश्रुत व सर्वज्ञात अशी उपचार पद्ध्ती आहे. हाडांच्या विकारांमध्ये अलीकडेच या उपचार पद्धतीची अत्यंत उपयुक्त अशी उपचार पद्धती म्हणून पडताळणी करण्यात आलेली आहे. ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजार असणाऱ्या रुग्णांना हि उपचार पद्धती वरदान ठरू शकते कारण यार कार्टीलेज पुन्हा तयार होऊन हाडांच्या घडणीला चालना मिळण्यास मदत होते असे नमूद करण्यात आलेले आहे. ऑस्टिओपोरोसिस च्या रुग्णांमध्ये बोन मिनरल डेन्सिटी म्हणजेच हाडांमध्ये असलेल्या क्षारांचे प्रमाण कमी झालेले असते त्यामुळे अशा रुग्णांना सतत फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांनी आहारामध्ये ड जीवनसत्वाचा समावेश करावा आणि व्यायम बरोबरच ही उपचार पद्धती घेली असता BMD च्या प्रमाणात चांगली सुधारणा झाल्याचे नमूद केल्या गेले आहे . MBST उपचार प्रणाली मधे ध्वनीलहरींचा वापर करून हायड्रोजन प्रोट्रॉनमध्ये उत्तेजना निर्माण करणे. त्यामुळे शरीरामध्ये उच्च ऊर्जेची परिस्थिती तयार होते . त्यानंतर हि ऊर्जा MRI मध्ये सोडली जाऊन मुक्त केली जाते. आणि आसपास असलेले टिश्यू ती ऊर्जा शोषून घेतात. एकदा का टिश्यूननी ही ऊर्जा शोषून घेतली कि पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होते. ह्युमॅटॉइड संधिवात , पाठीचा कणा व मणक्यातील डीजनरेटिव्ह विकार ,ऑस्टिओपोरोसिस अशा विविध विकारामध्ये MBST मुळे आराम मिळतो.

 

MBST चा मुख्यतः होणारा फायदा म्हणजे हि उपचार प्रणाली पेशींच्या स्तरावर जाऊन काम करते. त्यामुळे ती उपचारांच्या मूळ कारणाचे निराकरण करते. त्यामुळेच हि उपचार प्रणाली शरीरावर दीर्घकाळ परिणाम करणारी व दीर्घकाळ आराम देणारी आहे. ऑर्थोपेडिक्स च्या म्हणण्या नुसार रुग्णाच्या स्नायूंना दुखापती पूर्वी असलेल्या अवस्थेत घेऊन जाण्यास मेमरीला मदत मिळावी म्हणून फिजिओ थेरेपिय सुरु ठेवणे अपरिहार्य असते.

आपल्याला जे आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल सर्व ऑर्थोपेडिक समस्या टाळणे अत्यन्त महत्वाचे आहे. ऑर्थोपेडिक समस्या कशा टाळाव्यात याच्या काही टिप्स इथे देत आहोत.

नियमित व्यायाम करावा : तुमची हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते त्या साठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.

संतुलित आहार घ्यावा : हाडांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात  कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश आहे कि नाही  याची खात्री करावी .

निरोगी वजन राखावे : अतिरिक्त वजन हे तुमच्या सांध्यावर, तसेच विशेषत: गुडघे आणि नितंबांवर अतिरिक्त ताण आणते.

सक्रिय राहा: नियमित हालचाल केल्याने  सांधे कडक होत नाहीत व त्यामुळे तुमचे शरीर लवचिक रहाते  आणि तुमचे स्नायू मजबूत व बळकट होतात.

निष्कर्ष (Conclusion) :

ऑर्थोपेडिक्स हे एक असे विशेष  वैद्यकीय क्षेत्र आहे जे हाडांना होणाऱ्या समस्या, रोग  आणि त्यावरील उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करते. यातील काही समस्या या जन्मजात असू शकतात तर काही दुखापतीमुळे/ अपघातामुळे किंवा वयानुसार शरीराची झीज झाल्यामुळे उद्भवू शकतात. ऑर्थोपेडिस्ट बहुतेकदा एका व्यापक अशा ऑर्थोपेडिक टीम चा भाग होऊन कार्य करतात. त्यात फिजिशियन, थेरपिस्ट, प्रॅक्टिशनर्स, व्यावसायिक तसेच खेळाडूंचे ट्रेनर समाविष्ट असतात. ऑर्थोपेडिक सर्जन हे  त्यांचा वैद्यकीय परवाना  मिळविण्यासाठी न्यूरोसायन्सचे शिक्षण घेतात. हा परवाना कायम ठेवण्यासाठी त्यांना नियमित शिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी सतत प्रयत्नशील रहावे लागते.

Ashtvinayak Hospital is the best superspeciality hospital in Panvel Navi Mumbai, offering expert care in cardiology, orthopedics, urology, and more. Your health is our priority!

Quick Links